
न्यूयॉर्कहून इस्रायलला जाणाऱ्या डेल्टा एअरलाइन्सच्या विमानात मंगळवारी बॉम्बची धमकी मिळाल्याने घबराट पसरली. इस्रायल विमानतळ प्राधिकरणाला एका अज्ञात व्यक्तीकडून विमानात बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर बेन गुरियन विमानतळावर विमान उतरताच सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. विमानाची तपासणी सुरू आहे.
बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर न्यूयॉर्कहून येणारे डेल्टा एअरलाईन्सचे विमान इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावरील एका निर्जन पार्किंग परिसरात वळवण्यात आले. विमानतळ सुरक्षा दलाने तात्काळ प्रतिसाद देत सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानाची कसून तपासणी सुरू केली.



























































