Pradeep Purnekar Case – प्रदीप पुर्णेकर हत्येप्रकरणी माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या पतीची चौकशी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी ठाणे महापालिकेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या पतीची चौकशी सुरू आहे. गेल्या तासाभरापासून खंडणी विरोधी पथकाकडून मिनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची चौकशी सुरु आहे. प्रदीप पुणेकर हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना ठाणे गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

पूर्णेकर यांच्या हत्याकांडातील खरे मास्टरमाईंड माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे आहेत, असा आरोप पूर्णेकर यांनी केला आहे. मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या नावाची एफआयआरमध्ये नोंद करत त्यांचीही चौकशी करावी अशी मागणी पूर्णेकर कुटुंबीयांनी केली होती. शिंदे यांची चौकशी न केल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा पुर्णेकर यांचे पुत्र राम पुर्णेकर यांनी सोमवारी दिला होता. यानंतर मंगळवारी मिनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने चौकशी बोलावले आहे.