प्रवीण दवणे, बाळ कांदळकर, प्रवीण सोनावणे यांना कोमसापचे पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ कवी व गीतकार प्रा. प्रवीण दवणे, कवी बाळ कांदळकर व पत्रकार प्रवीण सोनावणे यांना कोकण मराठी साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दवणे यांना कविता राजधानी पुरस्कार तर अ. आ. देसाई स्मृती कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार कांदळकर यांना दिला जाणार आहे. सोनावणे यांना कोमसाप युवा पुरस्कार जाहीर झाला आहे.

मराठी कवितेच्या क्षेत्रात तसेच चित्रपट गीतांमध्ये प्रवीण दवणे यांनी आपला ठसा उमटवला असून त्यांच्या कार्याची दखल कोमसापने घेतली आहे. ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष बाळ कांदळकर यांनी साहित्य विषयक विविध उपक्रम राबवल्याबद्दल त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विद्यार्थी व युवकांपर्यंत साहित्य चळवळ नेण्यासाठी प्रयत्न करणारे प्रवीण सोनावणे यांना युवा पुरस्काराने गौरवले जाणार आहे. साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.