
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेल्या अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांनी हिंदुस्थान सोडण्याची नोटीस बजावली आहे. पोलिसांच्या या नोटिसीवर चित्रपट निर्मात्या किरण राव यांनी संताप व्यक्त करत इम्रान खानची पाठराखण केली आहे.
इम्रानचे वय 43 असून त्याने 40 वर्षे हिंदुस्थानात घालवली आहे. इथेच शिक्षण घेतले, काम केले, यश मिळवले, अपयश अनुभवले, प्रेम केले आणि संघर्षही केला, अशा व्यक्तीला हिंदुस्थान सोडण्यास सांगितले जात आहे, असे त्या म्हणाल्या. इम्रान खान हा आमीर खान यांचा पुतण्या आहे, तर किरण राव या आमीर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी आहेत. 10 ऑक्टोबरच्या मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या आंदोलनात इम्रान खान सहभागी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.



























































