ज्ञानेश कुमार यांना मतचोरीची किंमत मोजावीच लागेल, मोदी-शहांची झोप उडालीय! राहुल गांधी यांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मतचोरी झाल्याचे आम्ही पुराव्यासह दाखवून दिले असून काँग्रेस आपल्याला सोडणार नाही हे नरेंद्र मोदी आणि अमित शहांना कळून चुकले आहे. त्यामुळे त्यांची झोप उडाली आहे. ज्ञानेश कुमारांसह या दोघांनाही मतचोरीची किंमत मोजावीच लागेल,’ असा खणखणीत इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिला.

गोवा काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘गोवा रक्षण यात्रेच्या निमित्ताने मडगाव येथे झालेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. मतचोरीच्या मुद्दय़ावरून त्यांनी पुन्हा एकदा मोदी-शहा, ज्ञानेश कुमार आणि भाजपला घेरले. ‘देशाचे संविधान हा काँग्रेसचा धर्म आहे. संविधानावर हल्ला म्हणजे धर्मावर हल्ला आहे. भाजपने मतचोरी करून आमच्या धर्मावर हल्ला केला आहे. काँग्रेस हे कदापि खपवून घेणार नाही,’ असे ते म्हणाले. ‘नरेंद्र मोदी हे मतचोरीचे प्लानिंग करतात, अमित शहा प्रक्रिया ठरवतात आणि ज्ञानेश कुमार त्याची अंमलबजावणी करतात. विरोधकांची मते कापायची, स्वतःची मते वाढवायची. मतदार एका राज्यातून दुसऱया राज्यात पाठवायचे असे प्रकार केले जातात. मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक, छत्तीसगड, महाराष्ट्र, बंगाल आणि आसाममध्ये भाजपने अशा प्रकारे मतचोरी केली आहे. गोव्यात हे होऊ देऊ नका. सावध राहा,’ असे आवाहन राहुल यांनी केले.

संघाच्या शाखेत गेलात तर कुठलेही पद मिळू शकते!

शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर बोलणाऱया, रोजगाराबद्दल बोलणाऱ्या तरुणांवर पेलेट गन आणि लाठय़ा चालवल्या जात आहेत. प्रत्येक का@लेज आणि विद्यापीठात आरएसएसचे लोक बसवून ठेवले आहेत. पुलगुरू बनायचे असेल तर तुम्हाला गुणवत्तेची गरज नाही, फिजिक्स, केमिस्ट्रीचे ज्ञान असण्याची गरज नाही. तुम्ही संघाच्या शाखेत जात असाल तर देशातील कोणतेही पद तुम्हाला मिळू शकते, पुठलेही पंत्राट मिळू शकते असे चित्र आहे. हा देश कोणा एका संघटनेचा किंवा पक्षाचा नाही. हा देश जनतेचा आहे,’ असे राहुल यांनी ठणकावले.
मतचोरीचे आरोप केल्याबद्दल

माझ्यावर गुन्हा का नाही?

‘भाजपने माझ्यावर बदनामीचे 45 पेक्षा जास्त गुन्हे दाखल केले आहेत. त्यात शहांच्या बदनामीचे गुन्हे आहेत, मोदींच्या बदनामीचे आहेत. मात्र मी प्रत्येक राज्यात मोदी-शहांवर मतचोरीचा आरोप करतो. त्याबद्दल एकही गुन्हा दाखल होत नाही. याचे कारण सांगताना ते म्हणाले, ‘असा गुन्हा दाखल झाला तर हे प्रकरण कायदेशीर होऊन जाईल आणि मोदी-शहांसह सगळेच कायद्याच्या कचाटय़ात सापडतील हे त्यांना माहीत आहे.’