राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरुषप्रधान आणि संविधानविरोधी संघटना’, राहुल गांधीं यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका करत महिलांबाबतच्या संघटनेच्या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. संघ ही पुरुषप्रधान आणि संविधानविरोधी संघटना असून, महिलांना पुरुषांची मालमत्ता मानते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “संघ ही पूर्णपणे पुरुषप्रधान आणि संविधानविरोधी संघटना आहे. या संघटनेचा असा विश्वास आहे की महिला या पुरुषांची मालमत्ता आहेत.”

पुढे त्यांनी म्हटले की, “माझा शिव-शक्तीवर विश्वास आहे. त्यामुळे अशा विचारसरणीच्या विरोधात लढताना मला विशेष आनंद होतो.”

संघाच्या विचारसरणीला विरोध करताना आणखी एका मुद्द्याचा उल्लेख राहुल गांधी यांनी केला. संघटनेशी संबंधित असलेल्या अनेक महिला आपल्याला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी म्हटले. “सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, त्यांच्याच ‘स्वतःच्या’ अनेक महिला माझ्या बाजूने उभ्या आहेत,” असे राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये नमूद केले.