भुलेश्वर येथे डोक्यात गोळी झाडून व्यापाऱयाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

भुलेश्वर येथील एका व्यापाऱयाने शुक्रवारी सायंकाळी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. नितेश पूनमचंद राठोड (४६) असे या व्यापाऱयाचे नाव असून त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.

भुलेश्वर येथे राठी मॅन्शन ही नितेश राठी याच्या मालकीची इमारत असून याच इमारतीत तो कुटुंबासह राहत होता. शुक्रवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास घरात नोकर आणि एक महिला नातेवाईक घरात होते. याचवेळी एका खोलीत परवाना असलेल्या पिस्तूलने नितेश याने स्वतःच्या डोक्यात उजव्या बाजूला गोळी झाडून घेतली. याबाबत नोकराने कळवताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि नितेशला रुग्णालयात नेले, पण दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नितेशचा कपडय़ाचा व्यवसाय होता. शेअर मार्केटमध्येही त्याची गुंतवणूक होती. मात्र घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी न सापडल्याने त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही, अशी माहिती लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी दिली.