
सामना प्रतिनिधी । बीड
बीड येथील सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला दि.८ व ९ ऑक्टोबर रोजी नॅक मुल्याकंनात त्रिसदस्यीय समिती मार्फत केलेल्या मुल्यांकनात ए ग्रेड प्राप्त झाला आहे. सदर मुल्यांकन नविन आकृती बंधानुसार झालेले असून नविन आकृतीबंध पहिल्यापेक्षा क्लीष्ट मानला जातो. यामध्ये महाविद्यालयाने महाराष्ट्रातील आणि देशातील महाविद्यालयाच्या तुलनेत आपणे पूर्वीचे मानांकन कायम ठेवून सी.जी.पी.ए.३.११ वरून ३.१८ पर्यत नेला आहे. प्रथम क्रमांक मिळविला असून नॅक कमिटीच्या मुल्याकंनात देखील ए ग्रेड प्राप्त केला आहे.
या यशाबद्दल नवगण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास बडगे, सभापती दिनकर कदम यांनी प्राचार्या डॉ.दिपा क्षीरसागर व महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्राध्यापकांचा सत्कार करून कौतुक केले. देशभरातील महाविद्यालयाच्या मुल्याकंनात त्री सदस्यीय कमिटीने दि.८ व ९ ऑक्टोबर २०१८ रोजी के.एस.के.महाविद्यालयाला भेट देवून काटेकोरपणे पाहणी केली होती. या मुल्यांकनामध्ये ए ग्रेड प्राप्त झाला आहे. सदर मुल्याकंन नविन आकृतीबंधानुसार झाले असून नविन आकृतीबंध पहिल्यापेक्षा क्लीष्ट मानला जातो. यामध्ये महाविद्यालयाने पूर्वीचे मुल्याकंन कायम ठेवून सी.जी.पी.ए.३.११ वरून ३.१८ पर्यंत नेला आहे. दि.२ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसिध्द झालेल्या नॅक मुल्याकंनाच्या निकालात के.एस.के.महाविद्यालय ए ग्रेड घेवून महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे. स्व.काकूंनी उभारलेल्या नवगण शिक्षण संस्थेने ही यशाची भरारी घेतली आहे. या महाविद्यालयाला मिळालेल्या यशाबद्दल नवगण शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ आ.जयदत्त क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर, विलास बडगे, डॉ. योगेश क्षीरसागर यांनी अभिनंदन केले आहे. आज निकाल जाहीर झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष विलास बडगे, सभापती दिनकर कदम यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दिपा क्षीरसागर, उपप्राचार्य तथा नॅक समन्वयक डॉ. शिवानंद क्षीरसागर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. रेखा गुळवे, कमवि उपप्राचार्य एस.एम.सय्यद, पर्यवेक्षक जे.यु.कोळेकर, कार्यालयीन अधीक्षक् ए.एल.पवार, लेखापाल डॉ. व्ही.टी.देशमाने तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.




























































