आपचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांचं निलंबन मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांनी मांडलेल्या प्रस्तावावर आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांचं निलंबन सोमवारी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी मागं घेतलं आहे.

भाजप खासदारानं राज्यसभेत सांगितले की, आप खासदारानं आतापर्यंत भोगलेलं निलंबन ‘पुरेशी शिक्षा’ म्हणून ग्राह्य धरली जाईल आणि आजपासून राघव चड्ढा यांचं निलंबन रद्द करण्याचा विचार सभागृह विचार करू शकेल.

राघव चढ्ढा यांनी संसदेतील निलंबन मागे घेतल्यावर प्रतिक्रिया दिली आणि या निर्णयावर आनंद व्यक्त केला आणि सर्वोच्च न्यायालयासोबतच राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांचे आभार मानले.

‘निलंबनाच्या या 115 दिवसांमध्ये मला तुम्हा लोकांकडून खूप प्रेम आणि आशीर्वाद मिळाले. तुम्ही सर्वांनी मला माझ्या संघर्षात लढण्याची हिंमत दिली’, अशा शब्दात चढ्ढा यांनी जनतेचे आभार मानले.