
सामना ऑनलाईन, हैदराबाद
ज्योतिषाच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवला तर बॉलीवूड सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांची नात तसेच अभिषेक आणि ऐश्वर्या यांची मुलगी आराध्याच्या नशिबात पंतप्रधान बनण्याचा योग आहे. आराध्या राजकारणात चांगले करीअर करेल, असे ज्योतिषशास्त्र सांगत आहे. हैदराबाद येथील ज्योतिषी डी. ज्ञानेश्वर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बिगी बींची नात आराध्याविषयी अधिक माहिती देताना ज्ञानेश्वर यांनी सांगितले, ‘आराध्या भविष्यात पंतप्रधान होऊ इच्छित असल्यास तिला स्वतःचे नाव बदलून रोहिणी ठेवावे लागेल. तसेच ज्ञानेश्वर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा निवडणुका जिंकतील असे भाकीतही त्यांनी वर्तविले आहे. त्याचबरोबर रजनीकांत तामीळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०२४ मध्ये हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होईल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले आहे.
























































