
खंडणीसाठी एकाचे अपहरण करून मागील दोन वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला खंडणी विरोधी पथक एकने अटक केली आहे. आदित्य रोहिदास साळुंके (वय 24, रा. शिवणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला हवेली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
खंडणी विरोधी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस नाईक राजेंद्र लांडगे, विवेक जाधव, नितीन रावळ, प्रफुल्ल चव्हाण हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी दोन वर्षांपासून फरारी असलेला आरोपी वारजेतील आंबेडकर चौकात येणार असल्याची माहिती पोलीस नाईक नितीन रावळ आणि राजेंद्र लांडगे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आदित्य साळुंके याला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, एपीआय संदीप बुवा, नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, विवेक जाधव, प्रफुल्ल चव्हाण, दुर्योधन गुरव, हनुमंत कांदे यांनी केली.





























































