ब्रेक निकामी झाल्याने टेम्पो झाडाला धडकला; एकाचा मृत्यू, 18 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

कळव्याहून मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने तो झाडाला धडकल्याची घटना रविवारी सकाळी साकेतजवळ घडली. या घटनेत एका 25 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले आहेत. जखमींवर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रविवारी सकाळी 9.15 वाजता कळव्याहून साकेतमार्गे मुलुंडच्या दिशेने जात असताना टेम्पोला हा अपघात झाला. हा टेम्पो मजुरांना घेऊन मुलुंडकडे जात होता. या घटनेत आलम शौकत शेख ( वय 25) या मजुराला डोक्याला मार लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तर इतर 18 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.