आरेच्या राखीव जंगलात घुसखोरी करणाऱ्या तळीरामांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरेच्या राखीव जंगलात बेकायदा प्रवेश करून वाहने पार्क करणाऱया सहा वाहनांच्या चालकांवर वन विभागाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 38 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

आरेच्या क्षेत्रामध्ये गोरेगाव, मरोशी नगरचा काही भाग राखीव जंगल क्षेत्रात मोडतो. तिथे वाहनांना प्रवेशबंदी आहे तरीसुद्धा सहा वाहनांनी या क्षेत्रात बेकायदा प्रवेश केल्याचे गस्तीदरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱयांच्या निदर्शनास आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली गेली. प्रत्येक वाहनामागे पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. आरेच्या वनक्षेत्रात मद्यपान करणाऱया आठ जणांवरही वन विभागाने कारवाई केली. त्यांच्याकडून 38 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. वन विभागाच्या जागेमध्ये अवैध प्रवेश करणे, मद्यपान करणे, घाण कचरा टाकणे, वाहने पार्ंकग करणे हा कायद्याने गुन्हा आहे.