अभिनेता सुबोध भावेंचा ट्विटरला रामराम!

फोटो सौजन्य- फेसबुक

मालिका, चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते सुबोध भावे यांनी ट्विटरला रामराम ठोकला आहे. त्यांनीच ट्विट करत ही माहिती दिली आहे.

‘आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला. त्याबद्दल धन्यवाद. मी माझे ट्विटर अकाऊंट डिलीट करत आहे. काळजी घ्या. मस्त राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र’ असे ट्विट सुबोध भावे यांनी केले आहे. लॉकडाऊनदरम्यान मिळालेल्या रिकाम्या वेळेत सुबोध भावे सोशल मीडियावर बऱ्य़ापैकी सक्रिय होते. आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक घडामोडी, आठवणी त्यांनी चाहत्यांसोबत शेयर केल्या होत्या.

ट्विटरवर सध्या त्यांचे 94 हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. दरम्यान, ‘ट्विटरवरून बाहेर पडण्याचे काही विशेष कारण नाही. परंतु सोशल मीडियावरील वाढत्या निगेटिव्हिटीचा कंटाळा आल्याने सध्या यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा वेळ इतर कुठेही घालवता येईल. फेसबुक आणि इन्स्टाग्रामबाबत इतक्यात सांगू शकत नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या