
सामना ऑनलाईन, नागपूर
आधीचा काळ खरोखर कलाभक्तीचा होता. मात्र, आता सिनेसृष्टीत कलावंतांना म्हणावा तसा मान मिळत नाही, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी नागपुरात व्यक्त केली. भंडारा जिह्यातील लाखांदूर येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी असरानी आले होते. लाखांदूरला रवाना होण्यापूर्वी सकाळी काही वेळ ते नागपुरात थांबले. त्यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. चित्रपटसृष्टी किती बदललेय असे असरानी यांना विचारले असता, ते म्हणाले, आधीच्या काळात कलेवर, कामावर अधिक श्रद्धा होती. भूमिकेवर अधिक मेहनत घेतली जायची. दिग्दर्शक, कलावंतांचे संबंध निकोप होते. त्याहीउपर, कलावंतांना वेगळाच मान मिळायचा. आता तसे दिसत नाही. कथा, तंत्रज्ञान प्रचंड बदलले. कामाची पद्धतही बदलली. व्यावसायिकता अधिक आली. आता निर्मितीत मोठमोठय़ा कंपन्या उतरल्याने कलावंतांना मान मिळतोच असे नाही. अपवाद फक्त कलावंतांचा आहे, असेही असरानी म्हणाले.




























































