
प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर ‘आदिपुरुष’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. दुसरीकडे, सीता नवमीच्या खास मुहूर्तावर, निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर आणि ऑडिओ टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत शानदार दिसत आहे. हे मोशन पोस्टर आणि टीझर चाहत्यांना खूप आवडले आहे.
View this post on Instagram
सीता नवमीच्या मुहूर्तावर व्हिडिओ फॉरमॅटमध्ये रिलीज झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर खूपच दमदार दिसत आहे. अभिनेत्री क्रिती सॅननने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘आदिपुरुष’ चित्रपटातील जानकरी अवताराचा टीझर शेअर केला आहे. यामध्ये जानकी कृतीच्या डोळ्यातून अश्रूही वाहत आहेत. नवीन मोशन पोस्टरच्या शेवटी प्रभास प्रभू रामाच्या अवतारातही दिसत आहे. यासोबतच ‘राम सिया राम’ची मंत्रमुग्ध करणारे संगीत पार्श्वभूमीत वाजत आहे. हे पोस्टर शेअर करण्यासोबतच क्रितीने ‘सीता राम चरित अति पवन’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
View this post on Instagram
जानकीच्या भूमिकेतील क्रितीचा साधेपणा पाहून चाहते झाले फिदा
या चित्रपटातील पोस्टरमधील लूकमध्ये कपाळाला कुंकु, भांगेत सिंधूर, आणि पाणावलेले डोळे, पाहून सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. हा चित्रपट 16 जून 2023 रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.





























































