हिंदुस्थानच्या सुनील छेत्रीने इतिहास रचला, अर्जेंटिनाच्या मेस्सीला पछाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एएफसी आशियाई कप फुटबॉल स्पर्धेत हिंदुस्थान आणि थायलंडचा सामना रंगला. या सामन्यात हिंदुस्थान 4-1 असा विजय मिळवला.

स्टार खेळाडू सुनील छेत्रीने 27 व्या मिनिटाला 66 वा आंतरराष्ट्रीय गोल करून हिंदुस्थानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलसह छेत्रीने अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनल मेस्सीला पछाडत सर्वाधिक गोलचा रेकॉर्ड केला आहे. छेत्रीच्या पुढे आता फक्त पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो हा खेळाडू आहे.

थायलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी छेत्रीच्या नावार 104 आंतरराष्ट्रीय सामन्यात 65 गोल होते. या सामन्यात एक गोल करताच त्याने सध्याच्या फुटबॉ़लपटूंपैकी एक मेस्सीला पछाडले. मेस्सीच्या नावार 128 आंतरराष्ट्रीय सामन्यात 65 गोल आहे. तर पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या नावार 154 आंतरराष्ट्रीय सामन्यात 85 गोल आहेत.

नऊ वर्षानंतर आमने-सामने
दोन्ही संघ तब्बल 9 वर्षानंतर आमने-सामने आले आहेत. गेल्या वेळी थायलंडने हिंदुस्थानला दोन सामन्यात 2-1 आणि 1-0 असे पराभूत केले होते. तसेच गेल्या 33 वर्षात हिंदुस्थानला थायलंडचा पराभव करता आलेला नाही. त्यापूर्वी 1986 ला मेर्डेका कपदरम्यान हिंदुस्थानने विजय मिळवला होता. दोन्ही संघात आतापर्यंत एकूण 24 सामने रंगले. यात थायलंडने 12 सामन्यात, तर हिंदुस्थानने पाच सामन्यात विजय मिळवला तर सात सामने अनिर्णित राहिले.