
हिंदुस्थानातील नवी दिल्ली येथे असलेले अफगाणि दुतावास बंद होणार आहे. तशा प्रकारचा संदेश दुतावासाकडून हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाला कळविले आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता अफगाण दुतावासाला त्यांच्या देशातून कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य मिळत नव्हते. त्यामुळे सध्या हा दुतावास आर्थिक संकटात असून त्या पार्श्वभूमीवर दुतावास पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
तालिबानने 2021 मध्ये अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर हिंदुस्थानात असलेल्या दुतावासातील अनेक अधिकारी युरोप व अमेरिकेत निघून गेले. जे काही अधिकारी तिथे उरले होते ते देखील गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या देशांत आश्रय घेत आहेत.


























































