शिवसेनेच्या दणक्याने प्रशासन हादरले, भविष्य निधी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसामना प्रतिनिधी । मुंबई

कांदिवलीच्या भविष्य निधी कर्मचारी संघटनेच्या अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली दडपशाही आता थांबणार आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांबाबत अनेक तक्रारी होत्या. याबाबत कर्मचाऱ्यांनी शिवसेनेशी संपर्क साधल्यानंतर शिवसेनेच्या वतीने संघटनेच्या कांदिवली येथील कार्यालयावर धडक देण्यात आली. त्यानंतर हादरलेल्या प्रशासनाच्या वतीने आयुक्तांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले.

कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अधिकारीवर्गाच्या दडपशाहीबद्दल आणि कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याबाबत आमदार विलास पोतनीस यांनी भविष्य निधी कर्मचारी संघटनेच्या कांदिवली येथील कार्यालयाला भेट दिली. त्यांनी आयुक्त उदय बक्षी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर जातीने लक्ष देऊन त्या सोडवण्याचे आश्वासन आयुक्तांनी पोतनीस यांना दिले. यावेळी कर्मचारी संघटनेचे जनार्दन नारकर, सुभाष राऊत, विजय प्रकाश, हसन सय्यद, संतोष घरत आणि गुरनाथ नारिंग्रेकर आदी उपस्थित होते.