
एअर इंडिया फ्रान्सची विमान निर्माता पंपनी एअरबसकडून 100 नवीन विमाने खरेदी करणार आहे. या विमानांत 10 वाइडबॉडी ए350 आणि 90 नॅरोबॉडी ए320 फॅमिली विमान ए321 नियोचा समावेश आहे. 100 नव्या विमानांचीऑर्डर ही 470 विमानांच्या ऑर्डरपेक्षा वेगळी आहे. ही ऑर्डर एअर इंडियाने गेल्या वर्षी एअरबस आणि बोइंगला मिळून दिली होती. या ऑर्डरनंतर एअरबसला ऑर्डर दिलेल्या विमानांची एकूण संख्या 350 झाली आहे.
























































