
निर्मिती सावंत आणि अलका कुबल यांचं मनोरंजन विश्वात मोठं नाव आहे. दोघींनीही ऍक्टिंगपासून प्रोडक्शनपर्यंत विविध विभागांमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. या दोघींचे पडद्यापलीकडे एक अनोखे नाते आहे. अलका नेहमी निर्मिती यांना ‘वहिनी’ म्हणून संबोधतात. त्यामागील रहस्य त्यांनी ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उलगडले.
याबाबत अलका कुबल म्हणाल्या की, ‘निर्मिती वहिनींसोबत पहिल्यांदाच सिनेमात काम करत आहे. यापूर्वी मी त्यांच्यासोबत कधी काम केले नाही, पण त्यांच्या प्रोडक्शनच्या ‘आपलं माणूस’ या नाटकात काम केले आहे. ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाच्या निमित्ताने निर्मिती वहिनींसोबत काम करण्याचा योग जुळून आला. आमचे पडद्यापलीकडचे बॉण्डिंग खूप छान आहे.
मी महेश सावंत यांना ‘महेशभैय्या’ म्हणायचे, त्यामुळे ती ‘माझी वहिनी’ आहे. ती सर्वांची ‘निर्मितीताई’ असली तरी मी तिला ‘वहिनीच’ म्हणते. असे आमचे खरंच वेगळे नाते आहे.’ ‘आलंय माझ्या राशीला’ हा चित्रपट 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.