‘मीटू’ प्रकरणअभिनेते आलोकनाथ यांना जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

निर्माती विनता नंदा यांनी अभिनेते आलोकनाथ यांच्यावर 19 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. सोशल मीडियावर मीटू प्रकरणाने अक्षरक्षः चांगल्या चांगल्याची झोप उडाली होती. विनता नंदा यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी आलोकनाथ यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली होती. आज मुंबईच्या सत्र न्यायालयाने आलोकनाथ यांच्या जामीन याचिकेवर निकाल देत त्यांना जामीन मंजूर केला.

नोव्हेंबर महिन्यात अभिनेते नाना पाटेकर, आलोकनाथ यांच्यासह उद्योग, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकजणांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या होत्या. आलोकनाथ यांनीही विनता नंदा यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. विनता नंदा यांच्या 21 नोव्हेंबरच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या केसची 26 डिसेंबर रोजी न्यायालयाने सुनावणी केली होती. आलोकनाथ यांच्या वकिलांनी 23 डिसेंबर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार नवीन वर्षात त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून जामीन मंजूर करण्यात आला.