जबरदस्त… आयफोन 13 आला! एक टीबीपर्यंत स्टोरेज आणि अडीच तासांचा ज्यादा बॅटरी बॅकअप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईल क्षेत्रातील तगडी कंपनी ‘अॅपल’ने बहुप्रतिक्षित आयफोन 13 आणि आयफोन 13 प्रो लाँच केला आहे. कॅलिफोर्निया येथे आद दिमाखात हा सोहळा पार पडला. दमदार फीचर्सनी परिपूर्ण असलेली आयफोन 13 ची सीरीज युजर्ससाठी पर्वणी आहे. त्यामध्ये दीड ते अडीच तासांचा जादा बॅटरी बॅकअप, ए 15 चिप, अधिक प्रखर डिस्प्ले आणि व्हिडीओ पोर्ट्रेट मोडमधील शूटिंग अशा खास बाबी आहेत. आयपह्न 13 आणि आयफोन 13 मिनीमध्ये 256 जीबीपेक्षा अधिक स्टोरेज तर आयफोन 13 प्रो आणि आयपह्न मॅक्समध्ये एक टीबीपर्यंत स्टोरेज आहे. मिंनी सीरीजची सुरुवातीची किंमत 69,999 रुपये आयफोन 13 ची किंमत 79, 900 रुपये आहे. आयफोन 13 प्रोची किंमत एक लाख 19 हजार 900 रुपये तर प्रो मॅक्सची किंमत 1 लाख 29 हजार 900 रुपये एवढी आहे. नवी सीरिज गुलाबी, लाल, निळा, पांढरा आणि काळा या पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे.