
बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी अॅमेझॉनबरोबर पार्टनरशिप केली आहे. याअंतर्गत अलेक्सा सेलिब्रिटी व्हॉईसमध्ये प्रथमच देशात उपलब्ध होईल.
अॅमेझॉन इंडियाच्या म्हणण्यानुसार ग्राहकांना अमिताभ बच्चन यांचा आवाज अलेक्सामध्ये ऐकता येईल. यासाठी अमिताभ बच्चन यांना व्हॉईस एक्सपीरियन्स खरेदी करावा लागणार आहे. अमिताभ यांच्या आवाजातील अलेक्सा पुढील वर्षापासून उपलब्ध होईल.
अॅमेझॉन इंडियाने म्हटले आहे की, Amazon अॅमेझॉन अलेक्साची टीम अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करेल जेणेकरून त्यांचा आवाज अलेक्सासाठी अधिक चांगल्या प्रकारे वापरता येईल.
अमिताभ बच्चन यांच्या आवाजात अलेक्सा उपलब्ध होईल. विनोद, हवामान, कविता, प्रेरक कोट आणि सल्ले-सूचना अमिताभ बच्चन यांच्या आवाजात उपलब्ध असतील.
Alexa will have first ever celebrity voice experience in India. Hint: “Rishte mein toh hum tumhare baap lagte hai, naam hai _”
Any guesses? pic.twitter.com/bJonYB1Kli— Amit Agarwal (@AmitAgarwal) September 14, 2020
अलेक्सा व्हॉईस एक्सपीरियन्सच्या या पार्टनरशिपवर अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे की याबद्दल मी खूप उत्सुक आहे. व्हॉईस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी असे काही तयार केले ज्यामुळे ते आपल्याला प्रेक्षकांशी आणि हितचिंतकांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडून ठेवतील.
अलेक्सा, अॅमेझॉन इंडियाचे कंट्री हेड पुनीश कुमार म्हणाले की, अमिताभ बच्चन यांचा आवाज बॉलीवूडसोबत सर्व देशवासीयांसाठी मेमोरेबल आहे.
पुनीश कुमार म्हणाले की, ‘जेव्हा अलेक्सा वापरताना ग्राहकांना अमिताभ बच्चन यांच्या आवाजात उत्तर मिळेल तेव्हा काय प्रतिसाद देतात हे ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
युझर्सना अमिताभ बच्चनचा आवाज अनुभवण्यासाठी किती अधिकचे पैसे द्यावे लागतील, हे कंपनीने स्पष्ट करण्यात आलेले नाही.