
बिग बी अमिताभ बच्चन हे इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. नव्या नवेली, अगस्त्य आणि आराध्या यांच्यानंतर त्यांना पुन्हा एकदा पौत्ररत्नाचा लाभ झाला आहे.
बिग बींचे सख्खे बंधू अजिताभ यांची मुलगी नैना बच्चन आणि अभिनेता कुणाल कपूर यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. नैना आणि कुणाल यांचा विवाह 2015मध्ये झाला होता. लग्नाच्या सहा वर्षांनंतर त्यांच्या घरी पाळणा हलला आहे.
View this post on Instagram
कुणालनेच ही आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. तो म्हणतोय की, नैना आणि मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आता आम्ही एका सुंदरश्या मुलाचे आई-बाबा झालो आहोत. तुमच्या शुभेच्छांसाठी मनापासून आभार, असं म्हणत त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
View this post on Instagram




























































