टेकऑफ घेताच इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, 122 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स थोडक्यात बचावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमृतसरच्या श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल रात्री मोठा अपघात टळला. अमृतसर येथून कोलकाताकडे जाणाऱ्या इंडिगो विमानाने टेकऑफ केल्यानंतर चार मिनिटांतच इंजिनमध्ये बिघाड झाला. यामुळे हे विमान परत विमानतळावर उतरवावे लागले. या विमानात एकूण 122 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते.

रविवारी रात्री 10.24 वाजता इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट 5000 फूट उंचीवर पोहोचले तेव्हा चालक दलाला इंजिन बंद झाल्याची माहिती मिळाली. याबाबत तातडीने विमानतळ आणि आपत्कालीन सेवांना माहिती देण्यात आली. क्रूने हे विमान पुन्हा विमानतळाकडे वळवले आणि 16 मिनिटांनंतर ते विमानतळावर उतरवण्यात आले.

याबद्दल विमानतळ संचालक रितू शर्मा यांनी सांगितले की, कोलकात्याच्या विमानात 122 प्रवासी आणि 6 कर्मचारी होते. यानंतर इंडिगो एअरलाइन्सने पर्यायी विमानाची व्यवस्था करून प्रवाशांना कोलकाता येथे पाठवले.