
जेष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णा हजारे यांनी अलंकापुरीतील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सद्दिच्छा भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले आणि श्रींचे वैभवी चांदीचे पादुकांची पूजा केली. यावेळी श्रींचे पूजेचे पौरोहित्य वेदमूर्ती आनंद जोशी यांनी केले. मंदिरात श्रींचे चल पादुकापूजा, दर्शन, प्रदक्षिणा केली. आळंदी देवस्थानचे वतीने वतीने शाल, श्रीफळ ज्ञानेश्वरी, माऊलींचा प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.
या सद्दिच्छा भेट प्रसंगी त्यांचे समवेत वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक शांतीब्रम्ह मारुती महाराज कुरेकर, नरहरी महाराज चौधरी, राजाभाऊ रंधवे चोपदार, आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन कार्याध्यक्ष पुणे जिल्हा संघटक पै. बाळासाहेब चौधरी, आळंदी समिती शहर अध्यक्ष अर्जुन मेदनकर, माजी उपनगराध्यक्ष अशोक रंधवे पाटील, बाळकृष्ण मोरे, तुकाराम माने, ज्ञानेश्वर पोंदे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, संकेत वाघमारे, विलास वाघमारे, माजी नगरसेवक सागर भोसले, संस्थेचे व्यवस्थापक तुकाराम मुळीक यांचेसह वारकरी शिक्षण संस्थेचे साधक, भाविक उपस्थित होते.





























































