मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेची वार्षिक सभा उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेची 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शिवसेना भवन येथे अध्यक्ष बाबा कदम यांच्या अध्यक्षतेखाली व सरचिटणीस किशोरी पेडणेकर, म्युनिसिपल कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय बाफेरकर-कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. सभेमध्ये संघटनेचा या वर्षीचा कार्य अहवाल सादर करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने 195 अग्निशामक यांना प्रमुख अग्निशामक पदाची पदोन्नती संघटनेच्या प्रयत्नांमुळे देण्यात आली. सेवानिवृत्त दावे मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर संघटनेने केलेले प्रयत्न तसेच कर्मचाऱयांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे, असे कार्याध्यक्ष प्रशांत तळेकर यांनी सभेत सांगितले. संघटनेचे उपाध्यक्ष दिनेश सावंत, किशोर म्हात्रे, चिटणीस मिलिंद वळंजू, उमेश सिंहासने, अनिल खराटे, खजिनदार दशरथ घनवट, उपचिटणीस अफजल कागदी, पुष्कर शिंदे, संतोष वरवडेकर, सदस्य निवृत्ती इंगवले, विनोद सूर्यवंशी, प्रेमसिंग चव्हाण, मिलिंद चाबुकस्वार, कांचन मुंडे, प्रमुख सल्लागार राजाराम धुरी, दामोदर पांडकर, नारायण केदार यावेळी उपस्थित होते.