
सध्याच्या घडीला गुगलला टक्कर देईल असे एकही सर्च इंजिन उपलब्ध नाही. मात्र, लवकरच गुगलला टक्कर देण्यासाठी ऍपल स्वत:चे सर्च इंजिन लॉंच करणार आहे. कंपनीने सध्या या नवीन सर्च इंजिनबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. ऍपल त्यांच्या ‘डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2023 इव्हेंट’मध्ये हे सर्च इंजिन लॉंच करणार असल्याची चर्चा आहे. याच इव्हेंटमध्ये कंपनी मॅकबुक एअरसोबत आयओएस 16, आयपॅड ओएस 16, वॉचओएस आणि मॅकओएस 13 सॉफ्टवेअर अपडेट्स देखील जारी करू शकते.
























































