
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले यावेळी तो फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घालत आपले नाव गाजवले. सचिननंतर आता त्याचा मुलगा देखील क्रिकेट क्षेत्रात आपली कामगिरी दाखवण्यासाठी उतरला आहे. क्रिकेट क्षेत्रातील महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धांपैकी एक असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरु असून अर्जुन तेंडुलकरने यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले आहे. पण तो मुंबई संघातून न खेळता गोवा संघातून खेळात आहे.
2022-23 रणजी ट्रॉफीची स्पर्धा मंगळवारपासून सुरू झाली. यावेळी अर्जुन तेंडुलकर गोवा संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला. मुंबई संघ सोडत गोवा संघाकडून खेळण्याचे अर्जुनने यापूर्वीच निश्चित केले होते. गोवा आणि राजस्थान यांच्यात गोव्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. याच सामन्यात अर्जुन तेंडुलकरने गोवा क्रिकेट संघामधून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. पहिल्याच दिवशी त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली.




























































