निसर्गभान – परोपकारी कोकिळेचा आटापिटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जोसेफ तुस्कानो

दुसऱया पक्ष्यांच्या जिवांवर आपली अंडी उबवून घेण्यासाठी कोकिळा कुविख्यात आहे. आपली ओळख लागू नये व फसगत झालेल्या पक्ष्यांनी आपल्यावर हल्लाबोल करू नये, म्हणून कोकिळेला विविध क््प्त्या लढवाव्या लागतात. दुसऱया पक्ष्यांच्या घरटय़ात गुपचूप अंडी घालून झाल्यानंतर ती खरी यजमान घरटय़ातली घरधनीण सारी अंडी उबवत असते. अंडी उबली किंवा त्यातून पिल्ले बाहेर पडली की कोकिळा त्या घरटय़ात प्रवेश करते व त्या उपकारकर्त्या पक्ष्याच्या घरटय़ातून त्यांची उबलेली अंडी किंवा पिल्ले बाहेर काढते आणि स्वतःची पिल्ले त्यांच्याकडून वाढवून घेते.
त्यामुळे यजमान पक्षी कोकिळेवर हल्ला करून तिला पळवून लावण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही कोकिळा करडय़ा रंगाच्या असतात व त्या ससाण्यासारख्या दिसतात. त्यामुळे हे यजमान पक्षी त्यांच्या वाटेला फारसे जात नाहीत. अन् काही कोकिळा खाकी-लाल रंगाच्या असतात. कोकिळांच्या रंगातला हा फरक यजमान पक्ष्यांना गोंधळात टाकीत असतो.

केंब्रिज युनिव्हर्सिटीचे एक पक्षीतज्ञ डॉ. रोस थोरोगूड यांना आढळले की, एका विशिष्ट रंगाच्या कोकिळेवर यजमान पक्ष्यांचा हल्ला होतो तेव्हा त्या रंगाच्या कोकीळ पक्ष्यांना धोक्याचा इशारा पोहोचतो, अन् अशा वेळी दुसऱया रंगाची कोकिळा आपला डाव साधत असते. पक्ष्यांतली ही सामाजिकता प्रथमच संशोधकांच्या लक्षात आली आहे.

दुसऱया पक्ष्यांच्या (यजमानाच्या) घरटय़ात घातलेली कोकिळेची अंडी लवकर कशी उबतात व त्यातून पिल्ले लवकर कशी बाहेर पडतात, हे पक्षी शास्त्र्ाज्ञांना पडलेले एक कोडे होते. शेफिल्ड युनिव्हर्सिटीतील पक्षीतज्ञांच्या एका चमूने युरोपभरातील कोकिळांचा अभ्यास केला व हे कोडे उलगडून काढले. कोकिळा यजमानाच्या घरात अंडी घालण्यापूर्वी ती आपल्या शरीरात 24 तास उबवीत ठेवते व त्यामुळे घरटय़ातील इतर अंडय़ापेक्षा कोकिळेची पिल्ले अंडय़ातून लवकर बाहेर पडतात. त्यामुळे यजमानीची अंडी घरटय़ाबाहेर फेकून कोकिळा त्यांच्याकरवी आपल्या पिल्लांची वाढ करून घेत असते. केंब्रिज युनिव्हर्सिटीचे पक्षीतज्ञ डॉ. क्लेर स्पॉटिशवूड आणि डॉ. मार्टिन स्टीव्हन्स यांनी आफ्रिकेतील कडक तापमानाच्या देशातील परोपजीवी कोकिळांचा आणि त्यांच्या यजमानाचा अभ्यास केला, तेव्हा हे पक्षी एकमेकांना कसे बुचकळय़ात टाकतात, याचा त्यांना कमालीचा साक्षात्कार झाला. वर्षानुवर्षे त्यांच्यातला हा संघर्ष सुरू असून फुकटय़ा कोकिळा वेगवेगळय़ा युक्त्या लढवीत असताना यजमान पक्षी त्यांना हुसकावून लावण्यासाठी विविध तऱहेने सज्ज असतात. तिथले यजमान पक्षी विविध रंगांची नि आकाराची अंडी घालून परोपजीवी पक्ष्यांच्या डोळय़ांत धूळ फेकण्याचा प्रयत्न करतात. पक्ष्यांची नजर तीक्ष्ण असते व ते रंगातला अल्पसा फरक सहजगत्या जाणू शकतात. माणसे या पक्ष्याच्या अंडय़ाच्या रंगातला फरक जाणू शकत नाहीत. परोपजीवी कोकिळादेखील आपल्या यजमान पक्षिणीच्या अंडय़ांच्या रंगाची नक्कल करतात. त्यांच्यातला हा परंपरागत झगडा धावत्या काळासोबत उक्रांत होत आला आहे.
कोकिळेने आपली फसवणूक करू नये म्हणून पाकोळीच्या जातीचे पक्षी, आता आपली घरटी मुद्दाम मनुष्य वस्तीच्या सहवासात बांधू लागले आहेत. चीनमधल्या हॅनन नॉर्मल युनिव्हर्सिटीतील पक्षीतज्ञांनी ही बाब हेरली आहे. गावे, नगऱया, शहरे या ठिकाणच्या उघडय़ा जागेत कोकीळ पक्षी वस्ती करीत नसतो, ही त्यामागची गोम आहे.

अशा परोपजीवी प्रकारात कोकिळा एकटी नसून एकूण सात अन्य जातीचे पक्षीदेखील मोडतात. त्यात समुद्रपक्ष्यांचा भरणा आहे. स्कॉटिश मरीन इन्स्टिटय़ूट या स्कॉटलंडमधील संस्थेच्या शास्त्र्ाज्ञांनी स्कॉटलंडच्या पश्चिम किनाऱयावरील 69,000 घरटय़ांची पाहणी केली. 1996 ते 2008 या 14 वर्षांच्या काळातील, अभ्यासात विविध प्रकारचे 13 समुद्रपक्षी परोपजीवी असल्याचे आढळले. मात्र त्यांच्यात कोकिळेइतका चाणाक्षपणा दिसून आला नाही. त्यामुळे एकूण 69,775 घरटय़ांत त्यांना प्रत्येक 500 पैकी एका घरटय़ातच दुसऱया पक्ष्याची अंडी आढळली.

जर्मनीतील मॅक्स प्लान्क इन्स्टिटय़ूट या संस्थेतील पक्षीतज्ञांनी ऑस्ट्रेलियातील जंगलात भटकंती करून झेब्रा फिन्च या पक्ष्यांची घरटी तपासली तेव्हा त्यांच्या प्रत्येक अंडय़ामागे एक अंडे कोकिळेचे आढळले. पण कोकिळेला तो पक्षी घरटय़ात आपली अंडी उबवायला कधी प्रारंभ करतो याकडे लक्ष द्यावे लागते. झेब्रा फिंचच्या मादीने अंडी घालून उबवायला सुरुवात केली की कोकिळा आपला डाव साधून घेते. जर का तिने त्या पक्ष्याच्या आधी घरटय़ात अंडं टाकलं तर त्या पक्ष्याची जोडी ते घरटे सोडून जातात. तेव्हा कोकिळेला वेळेचा ताळमेळ जुळवावा लागतो.

(लेखक ज्येष्ठ विज्ञान अभ्यासक आहेत)