
हिवाळय़ात फक्त बाह्य उपायांनी त्वचेची काळजी न घेता शरीराला आतूनही योग्य पोषण देणेही महत्त्वाचे असते. चौरस आहार, योग्य व्यायाम, योग साधना यांमुळे तुम्ही तुमच्या त्वचेला हिवाळय़ात योग्य संरक्षण देऊ शकता. चौरस आहार घेताना तुम्ही योग्य फलाहारही घेणे गरजेचे असते.
हिवाळय़ात त्वचेचा ओलावा टिकवणे अत्यंत गरजेचे असते. नेहमीच्या दिवसांमध्ये हा ओलावा टिकून ठेवणे जेवढे गरजेचे असते, तेवढेच मेकअप करताना हा ओलावा जर चेहऱयावर टिकला तर मेकअप जास्त स्मूथ होतो. कारण त्वचा मऊ व मुलायम झाल्यामुळे त्वचेवर फाऊंडेशनचा बेस व्यवस्थित बसतो. चांगल्या पंपनीचे मॉइश्चरायझर वापरल्यामुळे त्वचेचे नुकसान भरून निघते.
- हिवाळय़ात त्वचेसाठी विटामिन ई व ग्लिसरीनयुक्त मॉइश्चरायझर वापरावे तसेच खोबरेल तेल किंवा नारळापासून बनवलेले मॉइश्चरायझर तसेच ज्या मॉइश्चरायझरमध्ये ऑइलचे प्रमाण जास्त असेल ते वापरावे.
- योग्य बॉडी लोशनमुळे पायाच्या त्वचेवर पडणाऱया भेगा कमी होण्यास मदत होते. तसेच केसांची त्वचाही जर कोरडी झाली तर कोंडा होण्याची भीती असते. केसांना जर तेलाचे पोषण द्या.
- वाळय़ात सौम्य शॅम्पू, साबण यांचा वापर करा. तसेच ज्यामध्ये ऑइलचे प्रमाण जास्त असेल अशा प्रकारच्या साबणाचा वापर करा.
- त्वचेला मॉइश्चरायझर किंवा ऑइलिंगची गरज आहे असे समजून त्वचेला मॉइश्चरायझर लावा.
हिवाळय़ात मेकअप करताना…
प्रथम सीटीएम झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित मॉइश्चरायझर चेहऱयावर लावून घ्या. तसेच हातापायांना बॉडी लोशन व्यवस्थित लावून घ्या. ओठांवर लीप बाम लावून घ्या. क्रीम प्रॉडक्ट हिवाळय़ाच्या दिवसात तुमची त्वचा चांगली ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे क्रिमी फाऊंडेशनचा वापर करा. हिवाळय़ात फाऊंडेशन वापरताना ते जास्त ड्राय असता कामा नये याची काळजी घ्या. त्यामुळे लिक्विड फाऊंडेशनचा वापर करा तसेच पावडर लावतानाही कमी प्रमाणात पावडर लावा. ब्लशरचा वापर करताना ड्राय ब्लशरचा वापर न करता क्रिमी स्वरूपातील विटॅमिन सी युक्त गुलाबाचा अर्क असलेले ब्लशर वापरा. काजळ वापरताना विटामिन सी की व कोरफडयुक्त स्मज प्रूफ काजळ वापरावे. त्यामुळे तुमचे डोळे हायडेटेड ठेवण्यास मदत होईल. नरिशिंग नॅचरल क्रिमी लिपस्टिकचा वापर करा. सौंदर्य खुलविताना योग्य माहिती करून घेतलेल्या मेकअप प्रोडक्टचा वापर केल्यास कोणत्याही ऋतूत तुम्ही उत्साही आनंदी, फ्रेश, हसतमुख दिसाल आणि तुमच्या असण्याने इतरांच्या आयुष्यातही आनंद पेराल.
शिवानी दिनेश गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
[email protected]





























































