स्वस्तात सोने खरेदीची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तीही स्वस्तात… तर तयार रहा. स्वस्तात सोने खरेदी करण्याचा पर्याय म्हणजे सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड. डिसेंबरमध्ये सॉव्हरिन गोल्ड बॉण्डचा हप्ता जारी होणार आहे. त्याचा फायदा ग्राहकांना नक्कीच उचलता येईल. सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड 2023-24 सीरीज 3 या महिन्यात 18 ते 22 डिसेंबरला खुली होईल. या पाच दिवसांत ग्राहकांना सोने खरेदी करता येईल.

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत, सरकार बाजारात प्रचलित सोन्याच्या किमतीपेक्षा खूपच कमी किंमतीत सोने खरेदी करण्याची संधी देते. आरबीआयने नोव्हेंबर 2015 मध्ये सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. आठ वर्षांत 12.9 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.

नेमकी योजना काय

गुंतवणूकदार डिजिटल सोने बाँडच्या माध्यमातून खरेदी करू शकतात आणि खरेदी केलेल्या सोन्याच्या रकमेसाठी गुंतवणूकदारांना समान किमतीचे सॉव्हरिन गोल्ड बाँड जारी केले जातात. सोन्याची भौतिक मागणी कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने ही शासकीय सुवर्ण रोखे योजना सुरू केली होती.