दहशतवादविरोधी कारवाई व्यापक हवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
terrorist-attack-pulwama

>> मच्छिंद्र पिराजी भोरे

दहशतवाद रोखण्यासाठी अनेक आघाड्या उघडाव्या लागतील. काही कश्मिरी विद्यार्थ्याना हाकलून दिल्याची बातमी मध्यंतरी आली. त्यांना संरक्षण दिले गेले असेलच. मात्र हे होणे योग्य नाही. शिवाय दहशतवाद्यांना अंतर्गत मदत करणाऱ्या आपल्या देशातील ‘स्लिपर सेल’कडेही लक्ष द्यावे लागेल. पुलवामा हल्ल्यात असे कोणी गद्दार असतीलच. तशी शंका संरक्षणतज्ञांनीही व्यक्त केली आहेच. तसेच पुलवामा हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला एवढा मोठा स्फोटकांचा साठा स्थानिक सहभागाशिवाय दहशतवाद्यांना मिळणे अशक्य होते.

पुलवामा येथे सी.आर.पी.एफ.च्या ताफ्यातील एका गाडीवर आत्मघातकी हल्ल्यामुळे 40 जवान शहीद झाले. त्यांच्या एका एका रक्ताच्या थेंबांची किंमत चुकवावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले व 100 तास उलटण्याच्या आतच लष्कराने त्या हल्याचा मास्टर माईंड अब्दुल गाझी व क्रूरकर्मा कामराज हिलाल याला ठार केले. या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करताना आमचे 5 जवान शहीद झाले. पुलवामाच्या हल्ल्यामुळे सारा देश पाकिस्तानविरुद्ध पेटून उठला. रास्ता रोको, दुकाने, शहरे बंद, मेणबत्ती मोर्चा, निदर्शने, झेंडे जाळणे, गोटा करणे असे खूप प्रकार देशभर झाले. पाकिस्तानविरुद्धची आग हिंदुस्थानात पेटते. धगधगते आहे. तरी केंद्र सरकारने आपल्या सैन्य दलांना दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्याची मुभा दिली आहे. एवढेच नव्हे तर आपल्या हवाई दलाने पाकव्याप्त कश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करून ते उदध्वस्त केले. याशिवाय व्यापार बंद, यू टय़ूबवरील पाकिस्तानी गाणी बंद, बॉलीवूड बंदी, पाकिस्तान निर्यातीवर 200 टक्के कर असे इतरही कठोर योजले आहेत. पाक हे दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जवळपास 50 राष्ट्रांचा हिंदुस्थानला पाठिंबा असून चीनची भूमिका संशयास्पद आहे. फ्रान्सने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर यास आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली. पंतप्रधानांनी सर्व पक्षीय बैठक घेतली. या साऱया पाकविरोधी घडामोडीमुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, ‘हिंदुस्थानने पुरावे द्यावेत. दहशतवादाने आमचे 100 अब्ज रुपयांचे नुकसान झाले व 70 हजार लोक मारले गेले.’ मग ते पाकिस्तानच्या भूमीवरील दहशतवादी तळ, कॅम्प्स लष्कराद्वारे का नष्ट करीत नाहीत? याचे त्यांच्याकडे उत्तर नाही. आपली संसद, मुलुंड, जयपूर, दिल्ली, पुणे, दादर, ऑपेरा हाऊस, जव्हेरी बाजार येथे 2001 ते 2011 पर्यंत सहा दहशतवादी हल्ले का झाले? मुंबई लोकलमधे 7 बॉम्बस्फोट 11 जुलै 2006 रोजी झाले. 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई हल्यात शेकडो मेले. त्यात पाकिस्तानचा हात होता याचे स्पष्ट पुरावे आहेत. पुन्हा आयएसआय ही पाकची गुप्तहेर संघटना या सर्वांमागे आहे हेही स्पष्ट आहे.

हिंदुस्थान सरकारने दहशतवाद रोखण्यासाठी 7 कायदे केले. पाकिस्तानमध्ये 21 दहशतवादी, धर्ममूलतत्त्ववादी संघटना असून हिजबूल मुजाहिदीन, हरकत उल अन्सार, जैश ए मोहंमद, तेहरीक ए तालिबान, जमात उल दावा, लश्कर ए तोयबा, अल बद्र या क्रूर संघटना आहेत. पुलवामा हल्ला घटनेने केवळ निषेध मोर्चेच नाहीत तर शहीद सैनिकांसाठी अंध, मुली, अभिनेते, पोलीस दल, क्रिकेटपटू, अनेक संस्था वगैरेचे हजारो हात सरकारच्या सहाय्यास आले. जनतेची तीव्र भावना एकच ‘पाकिस्तानला धडा शिकवा व दहशतवाद्यांचे मुडदे पाडा. दहशतवादी धर्मवेडय़ांना कळत नाही की निष्पापांच्या हत्याकांडांची पापे केल्यावर स्वर्ग कसा मिळेल? तसे असेल तर खुनी, गुन्हेगाराने, स्वर्ग भरले असते. कर्म तसे फळ यानुसार हत्याकांड, पापांची फळे दुःखदायी मिळणार! काळ बदलला. धर्माला वळणे लागली. म्हणूनच हे दुष्ट ईश्वराऐवजी आधुनिक तंत्रज्ञानावर पूर्ण भरोसा, श्रद्धा ठेवून. सहारा घेतात. फक्त तरुणांना वेडे करून वळविण्यासाठी व सहानुभूतीसाठी धर्म आणि देशाचा वापर करतात. त्यातूनच सुशिक्षित तरुणही ‘जिहादी’ बनण्यास तयार होतात. म्हणूनच आता विज्ञानाधारे धर्म चिकित्सा व समाज राष्ट्रहित याची तौलनिक सूत्रे प्रसृत करण्याची वेळ जगाला आली आहे.

दहशतवाद रोखण्यासाठी अनेक आघाडय़ा उघडाव्या लागतील. काही कश्मिरी विद्यार्थ्याना हाकलून दिल्याची बातमी मध्यंतरी आली. त्यांना संरक्षण दिले गेले असेलच. मात्र हे होणे योग्य नाही. शिवाय दहशतवाद्यांना अंतर्गत मदत करणाऱया आपल्या देशातील ‘स्लिपर सेल’कडेही लक्ष द्यावे लागेल. पुलवामा हल्ल्यात असे कोणी गद्दार असतीलच. तशी शंका संरक्षण तज्ञांनीही व्यक्त केली आहेच. तसेच पुलवामा हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला एवढा मोठा स्फोटकांचा साठा स्थानिक सहभागाशिवाय दहशतवाद्यांना मिळणे अशक्य होते. स्फोटकाची गाडी तेथे घुसलीच कशी? 14 डिसेंबर 1999 रोजी काठमांडूतून विमानात दहशतवादी असेच घुसले होते व त्यांनी विमानाचे अपहरण केले होते. विमानातील 176 प्रवाशांच्या बदल्यात मसूर अजहर व उमर सईद या दहशतवाद्यांना सोडावे लागले होते. त्यानंतर आपल्या संसदेवर हल्ला झाला व हा हल्लाही मसूदनेच घडविला होता. काही ठिकाणी हत्यारे साठवून गुप्तपणे ठेवली जात आहेत. दहशतवाद्यांसोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातमिळवणी करणाऱया प्रवृत्ती, लोक हिंदुस्थानात अनेक राज्यांत आहेत. म्हणूनच पाकिस्तानचा जयघोष करणारे, झेंडा लावणारे, हल्ल्यानंतर आनंद मानणारे जे कोणी देशद्रोही असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

याशिवाय संशयितांचे टेलिफोन टॅपिंग करावे. सीमेपलीकडील दहशतवाद्यांची ठिकाणे शोधून आधुनिक साधनांनी सर्व तळ नष्ट करावेत. दहशतवादी घटनांमध्ये पाकिस्तानचा कसा हात होता याचे पुरावे युनो व जगभरातील देशांना दाखवून द्यावेत. पाकिस्तानी मंत्र्याचा हाफिज सईदबरोबरचा व्हायरल झालेला व्हिडीओ व पुरावे हिंदुस्थानींना दाखवावेत. म्हणजे इम्रानचा खोटेपणा सिद्ध होऊन काहीना वाटणारी सहानुभूती नष्ट होईल. दहशतवाद्यांची बँक खाती गोठवावीत, दहशतवाद्यांना मिळणाऱया पैशांच्या सर्व वाटा बंद केल्यास दहशतवादी वठणीवर येऊ शकतात.