
नुकत्याच केरळच्या अल्लेप्पी जिह्यात पार पडलेल्या आशियाई सीनियर व मास्टर्स इक्यूप पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत हिंदुस्थानच्या खेळाडूंनी 36 सुवर्णांसह 26 रौप्य आणि 8 कांस्य जिंकत पदकांची लयलूट केली. हिंदुस्थानच्या यशात महाराष्ट्राच्या पॉवरलिफ्टर्सनी जोरदार कामगिरी करत सिंहाचा वाटा उचलला.
हिंदुस्थानच्या पॉवरलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध गटांत एकापेक्षा एक सरस कामगिरी नोंद करीत 10 सुवर्णांसह 5 रौप्य पदकांची कमाई केली. 93 किलो वजनी गटात जितेंद्र यादवला स्ट्रॉंग मॅन ऑफ आशिया पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्राच्या सोनेरी यशाबद्दल त्याच्यावर अक्षरशः कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
पदकप्राप्त महाराष्ट्राचे खेळाडू
सुवर्णपदकेः समृद्धी देवळेकर, अक्षया पडवणकर, राजेश शेटये, वैशाली तांडेल, नीरज कुमार यादव, अशोक मते, सोनल सावंत, जान्हवी सावर्डेकर, ज्योती पंधारे, सलमा शेख.
रौप्य पदकः धर्मेंद्रकुमार यादव, जितेंद्र यादव, शुभम गायकवाड, नवनाथ शिंदे, सेजल मकवाना.





























































