
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
खेड तालुक्यात मटका व्यवसायिकांने पत्रकाराला माराहाण केल्याची घटना घडली. या घटनेकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष दिले असून आता लवकरच मटक्यावरील कारवाईचा आकडा वाढणार आहे. खेड तालुक्यात मटका आणि अवैध धंदे सुरु असल्याची बातमी प्रसिध्द झाल्यानंतर खेड मधील दोन पत्रकारांना माराहाण केल्याची घटना घडली.या घटनेची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी घेतली असून माराहाण करण्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रत्नागिरीतील पत्रकारांनी मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन माराहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी याप्रकरणाची आपण चौकशी करणार असून मटका व्यवसायावर लवकरच कारवाईची मोहीम सुरु होईल असे आश्वासन दिले.पत्रकारांनी रत्नागिरी शहरात उलट्या दिशेला टपऱ्यांची तोंड ठेऊन होणाऱ्या मटका धंद्याची माहिती दिली. दिवसेंदिवस शहरात वाढलेल्या मटका व्यवसायाबाबत पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली.






























































