औराद शहाजनीच्या ग्रामसेवक आणि उपसरपंचाला लाच घेतांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

निलंगा तालुक्यातील मौजे औराद शहाजनी येथील ग्रामसेवक आणि उपसरपंच यांनी बारसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच स्विकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात ते अडकले. औराद शहाजनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या वडीलांच्या नावाने औराद शहाजनी येथे नवीन बार सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र हवे होते. ग्रामसेवक तुकाराम धोंडिराम बिराजदार आणि उपसरपंच मोहन लक्ष्मणराव भंडारे यांनी तक्रारदाराकडे १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ६० हजार रुपये घेण्याचे मान्य केले. उपसरपंचाच्या सांगण्यावरुन ग्रामसेवक तुकाराम धोंडिराम बिराजदार यांनी साक्षीदारासमक्ष ग्रामपंचायतीमध्ये ही रक्कम स्विकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. उपअधिक्षक माणिक बोंद्रे, पोलीस निरीक्षक वर्षा दंडिमे, कुमार दराडे, कर्मचारी संजय पस्तापुरे, व्यंकट पडिले, लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत डांगे, मोहन सुरवसे, नानासाहेब भोंग, शैलेश सुडे, विष्णू गुंडरे, सचिन धारेकर, दत्ता विभुते, प्रशांत स्वामी, शिवकांता शेळके, राजू महाजन यांनी परिश्रम घेतले.