हिरोची नवीन इलेक्ट्रिक सायकल हिंदुस्थानात लॉन्च; सिंगल चार्जमध्ये करता येणार 25Km चा प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार हळूहळू विस्तारताना दिसत आहे. अनेक कंपन्या आपले इलेक्ट्रिक कार आणि बाईक हिंदुस्थानी बाजारात उतरवत आहे. अशातच हीरो लेक्ट्रोने हिंदुस्थानात स्मार्ट आणि फ्यूचरिस्टिक इलेक्ट्रिक सायकलींची नवीन सिरीज लॉन्च केली आहे.

ही सायकल Commuter, Fitness (फिटनेस) आणि Leisure या तीन प्रकारामध्ये उपलब्ध आहे. हिरोच्या या सायकलमध्ये ब्लूटूथद्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आली आहे.

हे आहेत फीचर्स

या सायकलची Commuter श्रेणी ही कमी आणि मध्यम अंतराच्या ट्रिपसाठी चांगली आहे. फिटनेसची काळजी घेणाऱ्या लोकांना लक्षात ठेवून ‘फिटनेस’ ही सायकलची सिरीज बनविली गेली आहे. ज्यात ISmart फीचर्स आणि ब्लूटूथद्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सोबतच मॅप, बॅटरी चार्ज, मोड बद्दल रिअल-टाइम माहिती दिली जाते. या ई-सायकलमध्ये लिथियम-आयन बॅटरी आणि स्मार्ट ईडीयू वापरण्यात आला आहे. जे रायडरला चार वेगवेगळ्या मार्गाने चालविण्यासाठी उपयुक्त आहे.