
चार वर्षाखालील छोटय़ा मुलांना थंडी आणि ताप आल्यानंतर दिल्या जाणाऱया काही औषधांवर सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने बंदी घातली आहे. त्यात ग्लॅक्सोस्मिथक्लाइनची टी-मिनिक ओरल ड्रॉप्स, ग्लेनमार्कची एस्कोरिल फ्लू सिरप आणि आयपीसीए लॅबोरेटरीजच्या सोल्विन कोल्ड सिरपचा समावेश आहे. तसेच अन्य काही फार्मा कंपन्यांना औषधांवर इशारा लिहिण्याचे आदेश दिले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला औषधाला क्लोरफेनीरामाइन मॅलेट आणि फिनाईल फ्राइनच्या मिश्रणाने बनवलेल्या पॅकेजला अपडेट करण्यासही सांगितले आहे. डोळ्यातून पाणी येणे, सर्दी, शिंका येणे आणि नाक तसेच घशात खवखवणे यावर हे औषध दिले जाते.




























































