BAN vs NZ, 1st Test – शांतोची शतकी खेळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्णधार टीम साऊदीने दहाव्या क्रमांकावर येऊन केलेल्या 35 धावांच्या खेळीने न्यूझीलंडला 7 धावांची का होईना आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बांगलादेशी कर्णधार नजमुल हुसैन शांतोने खराब सुरुवातीनंतरही मोमीनुल हकबरोबर 90 धावांची भागी तर मुशफिकर रहीमसह 96 धावांची अभेद्य भर घालत तिसऱ्या दिवसअखेर संघाला 3 बाद 212 अशी मजल मारून दिली.

कालच्या 8 बाद 266 या धावसंख्येत साऊदीने 51 धावांची भर घालत बांगलादेशचे आघाडी मिळविण्याचे स्वप्न उद्ध्वस्त केले. त्याने कायल जेमीसनबरोबर नवव्या विकेटसाठी 52 धावांची भागी रचली. मोमीनुल हकने एकाच षटकात ही जोडी पह्डली आणि दोघांनीही बाद करत पाहुण्यांचा डाव 317 धावांवर संपवला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेशने महमुदुल हसन (8) आणि झाकीर हसन (17) या दोघा सलामीवीरांना बाद करून त्यांची 2 बाद 26 अशी अवस्था केली, पण त्यानंतर शांतोने दोन महत्त्वाच्या भागी करत संघाला दोनशेचा टप्पा गाठून दिला.