
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेमुळे त्यांच्याशी चर्चा होत नाही. ते थोडी शिवराळ भाषा वापरतात, त्याच्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य करता येत नाही असं सरकारच म्हणणं आहे. मग विद्यानंद बापट सभ्य, संस्कारी, सुसंस्कृत भाषा वापरतात पण अशी ही भाषा वापरली म्हणून त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्यात का? असा संतप्त सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. त्यामुळे मागण्या मान्य करण्यासाठी भाषा हा मुद्दाच असू शकत नाही असे संजय राऊत यांनी व्यक्त केले.
संजय राऊत यावर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जरांगे पाटील त्यांचा कालचा कार्यक्रम मी पाहिला. ते मुंबईला धडकणार आहेत. बीडला येतील मग श्रीगोंद्याला जातील मग पुढे त्यांचा जो दौरा आहे तो मी पाहिला. आणि कोर्टाने सांगितलं की, त्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्यामुळे ते आंदोलन करतील. मला आश्चर्य वाटतय त्यांच्याशी चर्चा होत नाही. चर्चा न होण्याच पहिलं कारण अस आहे की त्यांची भाषा चांगली नाही. बरोबर ना? ते थोडी शिवराळ भाषा वापरतात त्याच्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य करता येत नाही असं सरकारच म्हणण आहे. म्हणजे सरकारच्या काही मंत्र्यांनी वारंवार तसं सांगितल. मान्य आहे हेच जर कारण असेल तर पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापटअत्यंत सभ्य आणि संस्कारी भाषेत त्यांचे आंदोलन करत आहेत.
म्हणजे विद्यानंद बापट यांचा एक आदर्श आहे मराठी भाषे संदर्भातला. सभ्य संस्कारी सुसंस्कृत भाषा वापरतात पण अशा ही भाषा वापरली म्हणून त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्यात का? उलट सभ्य संस्कारी आणि सुसंस्कृत भाषा वापरली म्हणून त्यांच्यावर सरकार पुरस्कृत गुंडांनी हल्ला केला हल्ला केला. आणि त्याना ठार मारण्याचा प्रयत्न केला सभ्य भाषा वापरणाऱ्या विद्यानंद बापट त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न त्याना धमक्या येतात त्याना धमक्या येता.त त्यांना परवाच्या मोर्चाला बाहेर पडू दिलं नाही. सभ्य संस्कारी आणि सुसंस्कृत भाषेच हे मोल मग जरांग्या पाटलांनी एका पोट तिडकेने भाषा वापरली त्याच्यामुळे सरकारचा एवढा जळफळाट व्हायचा कारण नाही. विद्यानंद बापट वापरतात त्यांच्या वतीने संस्कारी भाषा ती तुम्ही स्वीकारा मागण्या मान्य करा तुमही त्याही करत नाही भाषा हा मुद्दा होऊ शकत नाही मागण्या मान्य करता.
ज्याला जी भाषा कळते ती भाषा वापरावी असं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं ज्याला जी भाषा उत्तम कळते ती भाषा वापरावी सरकारला जर चुकीची भाषा कळत असेल तर ती भाषा वापरायला पाहिजे. सरकारमध्ये अर्धे लोक भ्रष्ट आणि गुंड आहेत त्यांना कुठली भाषा कळणार? मला सांगा जरा, असा सवालही संजय राऊत यांनी केला.























































