टीम इंडियाचे आगामी मोसमाचे वेळापत्रक जाहीर, बीसीसीआयचे टी-20ला प्राधान्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. सर्व देशावर सध्या विश्वचषकाचा फिव्हर चढलेला आहे. ही स्पर्धा सुरू असतानाच बीसीसीआयने हिंदुस्थानी संघासाठी विश्वचषकानंतरच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. विश्वचषकानंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर 5 कसोटी, 9 वन डे आणि 12 टी-20 सामने खेळणार आहे. 2020 साली ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 विश्वचषक डोळ्यांसमोर ठेवून बीसीसीआयने टी-20 सामन्यांना अधिक प्राधान्य दिले आहे.

फ्रिडम चषक 2019 (विरुद्ध दक्षिण आफ्रिका)

  • 15 सप्टेंबर – पहिली टी-20, धरमशाला
  • 18 सप्टेंबर – दुसरी टी-20, मोहाली
  • 22 सप्टेंबर – तिसरी टी-20, बंगळुरू
  • 2 ते 6 ऑक्टोबर – पहिली कसोटी, विशाखापट्टणम
  • 10 ते 14 ऑक्टोबर – दुसरी कसोटी, रांची
  • 19 ते 23 ऑक्टोबर – तिसरी कसोटी, पुणे

बांगलादेशचा हिंदुस्थान दौरा

  • 3 नोव्हेंबर – पहिली टी-20, दिल्ली
  • 7 नोव्हेंबर – दुसरी टी-20, राजकोट
  • 10 नोव्हेंबर – तिसरी टी-20, नागपूर
  • 14 ते 18 नोव्हेंबर – पहिली कसोटी, इंदूर
  • 22 ते 26 नोव्हेंबर – दुसरी कसोटी, कोलकाता

वेस्ट इंडीजचा हिंदुस्थान दौरा

  • 6 डिसेंबर – पहिली टी-20, मुंबई
  • 8 डिसेंबर – दुसरी टी-20, थिरुवनंतपुरम
  • 11 डिसेंबर – तिसरी टी-20, हैदराबाद
  • 15 डिसेंबर – पहिली वन डे, चेन्नई
  • 18 डिसेंबर – दुसरी वन डे, विशाखापट्टणम
  • 22 डिसेंबर – तिसरी वन डे, कटक

झिम्बाब्वेचा हिंदुस्थान दौरा – (2020)

  • 5 जानेवारी – पहिली टी-20, गुवाहाटी
  • 7 जानेवारी – दुसरी टी-20, इंदूर
  • 10 जानेवारी – तिसरी टी-20, पुणे

दक्षिण आफ्रिकेचा हिंदुस्थान दौरा – (2020)

  • 12 मार्च – पहिली वन डे, धरमशाला
  • 15 मार्च – दुसरी वन डे, लखनौ
  • 18 मार्च – तिसरी वन डे, कोलकाता

ऑस्ट्रेलियाचा हिंदुस्थान दौरा – (2020)

  • 14 जानेवारी – पहिली वन डे, मुंबई
  • 17 जानेवारी – दुसरी वन डे, राजकोट
  • 19 जानेवारी – तिसरी वन डे, बंगळुरू