मोदींचे आश्वासन हवेतच, पण शेतकऱ्यांना अचानक धनलाभाने चर्चेला उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा होतील असे निवडणुकीत म्हटले होते ते आज पर्यंत जमा झाले नाहीत. मात्र बीडच्या दासखेड गावात अचानक शेतकऱ्यांच्या खात्यात हजार, पाचशे रुपये जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पाटोदा तालुक्यातील दासखेड गावातील दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांच्या खात्यात हजार, पाचशे, दोन हजार रुपये जमा झाले आहेत. हे पैसे कोठून जमा झाले. कोणी केले हे कळले नाही मात्र बीड एनआयसीच्या नावे जमा झाल्याचे दिसत असून हे पैसे कशाबद्दल आहेत हे मात्र समजू शकलेले नाही. खात्यावर पैसे जमा झाल्याने गावातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. कोठून आले याची खातरजमा नंतर करू आधी आलेली रक्कम काढून घेऊ यासाठी ग्राहकांना घाई झाली आहे.