गुणकारी जायफळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मसाल्याच्या पदार्थांमधील जायफळ… स्वयंपाकघरात हमखास वापरले जाते, मात्र यामध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत.

  •  सकाळी रिकाम्यापोटी अर्धा चमचा जायफळ उगळून चाटावे. यामुळे  सर्दी, खोकला, पचनाच्या समस्यांचा त्रास होत नाही.
  •  पोटदुखीचा त्रास झाल्यास चार-पाच थेंब जायफळाचे तेल साखरेसोबत घेतल्याने आराम मिळतो.
  •  डोके दुखत असल्यास जायफळ पाण्यात उगाळून डोक्याला लावावे.
  •  भूक लागत नसेल तर चिमूटभर जायफळ भाजून घ्या. त्याचे चार भाग करा. सकाळ-संध्याकाळ एक-एक भाग चघळा.
  •  कंबर दुखत असल्यास जायफळ पाण्यात उगळून कंबरेवर सकाळ-संध्याकाळ घासावे.
  •  टाचांना भेगा पडल्यास जायफळाची पेस्ट भेगांमध्ये भरावी.
  •  जायफळाचे चूर्ण मधासोबत खाल्ल्याने ह्रदय मजबूत बनते आणि पोटही चांगले राहते.
  •  जीव घाबरत असल्यास जायफळ थोडे घासून पाण्यात मिसळून प्यायल्याने आराम मिळतो.
  •  चेहऱयावर सुरकुत्या पडल्या असतील तर जायफळाच्या पेस्टचा लेप लावावा.
  •  डोळ्याच्या भोवती काळी वर्तुळे दिसत असल्यास झोपेच्या वेळी रोज जायफळाचा लेप लावावा. सुकल्यानंतर धुवावे. काळी वर्तुळे निघून जातील.
  •  दातदुखी होत असल्यास जायफळाचे तेलात कापूस बुडवून तो कापूस दुखऱया दाताखाली ठेवावा. यामुळे दातदुखी थांबेल. दाताला लागलेली कीडही मरून जाईल.