भारत स्काऊट्स-गाईड्सच्या; कब्स, बुलबुल यांना सुवर्णबाण पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पालिका शिक्षण विभाग – भारत स्काऊट्स आणि गाईड्स उत्तर व दक्षिण पालिका जिल्हा संस्था तसेच महाराष्ट्र राज्य कार्यालयातर्फे घेतलेल्या सुवर्णबाण चाचणी परीक्षेत 5 ते 10 वयोगटातील 19 कब्स आणि 4 बुलबुल यांना यश प्राप्त झाले आहे. दिल्लीत फेब्रुवारीत होणाऱया कार्यक्रमात सुवर्णबाण पुरस्कार दिला जाणार आहे.

भारत स्काऊट्स, गाईड्समध्ये मुलांना कब्स तर मुलींना बुलबुल म्हटले जाते. सुवर्णबाण चाचणी परीक्षेत ना. म. जोशी मराठी शाळा क्र.1, करी रोड (पश्चिम) दक्षिण मुंबई जिल्हा संस्थेचे यशराज कांबळे, भूषण काविलकर, ओमकार आडिवरेकर, चैतन्य गायकवाड, आदित्य जाधव, मरोळ पोलीस पॅम्प मराठी शाळा, अंधेरी (पश्चिम) या शाळेतून जितुराज दळवी, ओमकार मदने, रोशन सदाफुले, गणेश भिसे, अंश वर्मा, समर्थ वर्दे, घाटकोपर पश्चिममधील वि.पा.सा.मनपा इंग्रजी शाळेतून आदित्य पांडे, आविष्कार सिंह, अनमोल यादव, मो. युसूफ खान, आकीब शेख, दिलशद शेख, दुर्गेश राजभर तर विक्रोळी पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका मराठी शाळा क्र. 1 मधून रितेश यादव असे एकूण 19 कब्स उत्तर मुबंई जिल्हा संस्थेतून पात्र झाले आहेत. तसेच रमाबाई सहकारनगर पालिका मराठी शाळा क्र. 2 मधून अनुष्का तोरणे, सोनाली चव्हाण तर वांद्रे पेटिट म. न. पा. उ. प्रा. इंग्रजी शाळेतून सुफिया शेख, तसबीया कुरेशी यांनी यश मिळवले आहे. कब्स-बुलबुल सुवर्णबाण पुरस्कार परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य आयुक्त उत्तर-मुंबईचे राजू तडवी यांच्यासह इतरांचे मार्गदर्शन मिळाले आहे.