भारती विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा, राज्यमंत्री सत्यपाल सिंह देणार दीक्षान्त भाषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा १९वा पदवीप्रदान सोहळा २२ जून रोजी होत असून, यामध्ये ७३३८ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाने यावेळी ९० जणांना पीएच.डी. आणि ५० विद्यार्थ्यांना सुवर्णपदके दिली आहेत.

विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्या उपस्थितीत कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी ही माहिती दिली. पदवीप्रदान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह हे उपस्थित राहून दीक्षान्त भाषण देणार आहेत. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. कदम असणार आहेत. डॉ. पतंगराव कदम संस्थापक कुलपती असलेल्या या संस्थेने ५४व्या वर्षात पदार्पण केल्याचे सांगून डॉ. साळुंखे म्हणाले, पूर्वप्राथमिकपासून डॉक्टरेटपर्यंत शिक्षण देणाऱ्या १८० संस्था भारती विद्यापीठच्या छत्राखाली आहेत. त्याचे रूपांतर विश्वविद्यालयात रूपांतर झाले. पदवीप्रदान सोहळा शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता भारती विद्यापीठ संकुल, धनकवडी आवारात होणार आहे. प्र-कुलगुरू आमदार विश्वजित कदम यावेळी उपस्थित राहणार असल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

‘नॅक’चा ‘ए प्लस’ दर्जा
देशातील विद्यापीठ आणि कॉलेजांचे गुणवत्तेचे मूल्यांकन करणाऱ्या ‘नॅशनल अ‍ॅसेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रिडिटेशन कौाqन्सल’ने (नॅक) तृतीय मूल्यांकनात भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाला ‘ए प्लस’ दर्जा दिला आहे, असे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी सांगितले. केंद्राने देशातील १२९ अभिमत विद्यापीठांच्या शैक्षणिक कार्याचे मूल्यमापन करणारी उच्चाधिकार समिती गठित केली होती. या समितीने केलेल्या मूल्यमापनानंतरच्या शिफारशीवहन मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘अ’ दर्जाचे विद्यापीठ, अशी मान्यता दिल्याची माहिती कदम यांनी दिली.