मोठी बातमी – मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला, गाडी रोखून केली मारहाण

heramb-kulkarni

मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचं वृत्त कळतं आहे. काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. हेरंब कुलकर्णी हे एक मराठी लेखक आहेत. ते विशेषतः शिक्षणविषयक लेखन करतात. ‘शाळा आहे – शिक्षण नाही’, या त्यांच्या पुस्तकानानं राज्यातील शिक्षणाची स्थिती समोर मांडली आहे. तर शैक्षणिक प्रयोगांसंदर्भात त्यांनी बरचं लेखन केलं आहे. तसंच दारूबंदीसाठी चाललेल्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग आहे.

हेरंब कुलकर्णी यांनी या संदर्भात एक तक्रार दिली आहे. या तक्रारीत ते म्हणतात की त्यांच्या सहकाऱ्यांसोबत ते गाडीवर जात असतानाच तीन अनोळखी व्यक्तींनी गाडीवरती त्यांचा पाठलाग केला. ते गाडीच्या समोर आले, त्यांनी गाडी थांबवली. त्यानंतर गाडीवरील दोन व्यक्ती आमच्याजवळ आले आणि त्यांनी काहीच न बोलता मारहाण करण्यास सुरूवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)