तर लॉकडाऊन फेल होईल, मुख्यमंत्री नितिश कुमार यांची टीका

हिंदुस्थानात आतापर्यंत 873 कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हिंदुस्थानात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. तसेच सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मजूरीसाठी दुसर्‍या राज्यात गेलेले मजुर अडकले आहेत. ते पायीच आपल्या घरी निघाले आहेत. या मजुरांची आहे त्या ठिकाणी व्यवस्था करणे गरजेचे आहे, त्यांना आपल्या राज्यात बोलवणे चुकीचे आहे असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हटले आहे. तसेच त्या लोकांना आपल्या राज्यात बोलवल्याने लॉकडाऊनचा उद्देश असफल होईल असेही नितीश कुमार म्हणाले.

दिल्ली, उत्तर प्रदेशच्या सीमेवर अनेक मजुर आपल्या घरी येण्यासाठी परतले आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बसची व्यवस्था केली आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक बिहारी मजदूर आपल्या घरी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जे लोक ज्या ठिकाणी त्यांची तिथेच व्यवस्था केली पाहिजे असे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केले आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जर स्थलांतर होऊ लागले तर कोरोनाचा धोका अधिक वाढेल आणि लॉकडाऊनचा उद्देश असफल होईल असेही नितीश कुमार म्हणाले.

देशात कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात लॉकडाऊन जारी केल्याने हजारो मजूर पायीच आपल्या घरी पोहोचत आहेत. हे मजूर मोठ्या संख्येने हायवेवर अडकले आहेत. यादरम्यान उत्तर प्रदेश आणि दिल्ली सरकार बसच्या माध्यमातून त्यांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या