
अनेक राज्यांमध्ये फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता उलथवून टाकणाऱया भाजपने पक्षातील लोकशाहीलाही मूठमाती दिली आहे. भाजपमध्ये आता राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी निवडणुकीची गरज नाही. हे पद रिक्त झाल्यास संसदीय मंडळालाच अध्यक्ष निवडीचा अधिकार असेल, असा घटना दुरुस्ती करणारा ठराव भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात मंजूर करण्यात आला.
अध्यक्ष पदाबाबतचा ठराव मंजूर केल्यानंतर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे.
अध्यक्ष पदासाठी निकष
संबंधित व्यक्ती किमान 15 वर्षे पक्षाची प्राथमिक सदस्य असणे आवश्यक आहे. कलम 19 नुसार निवड समितीत एकूण 20 सदस्य राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पात्र असलेल्या व्यक्तीचे नाव सुचवतील. हा संयुक्त प्रस्ताव किमान 5 राज्यांमधून आला पाहिजे, जिथे राष्ट्रीय परिषद निवडणुका झाल्या आहेत.


























































