भाजप नेत्याची खडसेंविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, जळगाव
भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात तक्रार करणारे एक पत्र मुंबई उच्च न्यायलायाच्या एका न्यायाधीशांना मिळाले आहे. हे पत्र भाजप आमदाराच्या लेटरहेडवर असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या लेटरहेडवर आमदाराची सही नसल्याने हा कोणीतरी खोडसाळपणा केला असा अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. जळगावचे आमदार सुरेश भोळे यांचे लेटरहेड वापरून ही तक्रार केली होती. पण हे पत्र आपण पाठवले नसल्याचे भोळे यांनी स्पष्ट केले आहे. या पत्रात ‘खडसे यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असून त्यावर चौकशी व्हावी’ अशी मागणी केली होती. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिले आहे.
खडसेंच्या कन्या ज्या सहकारी बँकेत अध्यक्षपदावर आहेत त्या बँकेतून नोटाबंदीच्या काळात कोट्यवधी रुपयांच्या नोटा बदलण्यात आल्या असा आरोप या पत्रात केला होता तसेच या प्रकरणी सीबीआय चौकशी झाली तरी ती दाबण्यात आली असेही या पत्रात नमूद केले होते. या पत्रावर जावक क्रमांक नव्हता. यावर प्रतिक्रिया देताना भोळे म्हणाले की “खडसे आमचे नेते असून हे कृत्य कोणीतरी खोडसाळपणे केले आहे. यामागे आम्हाला बदनाम करण्याचा हेतू आहे.” या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षाकांकडे केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.